Monday, 15 August 2011

आयुष्यात काही क्षण असेही येतात ..............

ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही


अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधीकधी रक्ताची नातीही नकळत तुटतात


तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात


कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात


तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात

आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत


अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमतकधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत


तर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळखकधी सोबत असूनही प्रेम आटते


तर कधी विरहहि संगमाप्रमाणे....


No comments:

Post a Comment