Monday, 15 August 2011

कधीतरी अनोळखी वाटेवरती चालावस वाटत ....

मनातल काही बोलावस वाटत...


चालता बोलता सुचत बरंच असत ....


पण वाटे वरती कोणीच नसत....

अशाच एका "अनोळखी " वाटे वरल्या चार ओळी....वाट ही जीवनाची....


वाट ही मरणाची...


या वाटेवर चालणाऱ्या


प्रत्येकाच्या वाट्याची...!!वाट ही सुखाची...


वाट ही दुःखाची....


उन पावसात न्हाणाऱ्या


वाटेवरल्या दगडाची...वाट ही उष्मेची....


वाट ही छायेची..


पानापाचोल्यातील


प्रत्येकी फुलाची...वाट ही अशीच - अखंड.....


क्षितिजा पलीकडे गेलेली...


वाट ही अशीच - अनामिक.....


प्रत्येकाच्या आयुष्यात दडलेली....!!!या वाटेशीच जडले .....


जीवनाचे गूढ नाते....


सरते शेवटी 'वाट ' ही......


वाटेवरती विरुनी जाते.............!!!!!!!!


No comments:

Post a Comment