Tuesday, 25 October 2011

तमसोमाज्योतीर्गामय


दिवाळीचा  सण
दिव्याची रोषणाई नि रंगांची उधळण 
उत्साहाचा आनंदाचा तेजोमय क्षण ......

अशा या मंगल दिनी 
एक  दिवा लावावा   देवापुढे - सुख  आणि शांती साठी ....
एक  दिवा लावावा   उंबरठ्यावर - यश प्राप्तीसाठी  नि सदसतविवेकसाठी ....
एक  दिवा लावावा  तुळशीवृन्दावनी - समृद्धी नि वैभवासाठी ....
एक  दिवा लावावा रांगोळीभोवती - आनंद  आणि समाधानासाठी ....

मग
 एखादा  तरी   दिवा लावावा  त्यांचासाठी जे आजही अंधारात आहेत .....
ज्यांचा कडे तूप नाही , तेल नाही,
 दिव्याला वात नाही, ज्यांना  कोणाची साथ नाही ......

 एखादा  तरी   दिवा लावावा  त्या हौतात्म्य पत्कारनार्यांसाठी .....
 एखादा  तरी   दिवा लावावा  त्या वीर देश बांधवांसाठी (सैनिकांसाठी) .....
 एखादा  तरी   दिवा लावावा आजन्म समाज कार्य करणाऱ्या थोर सामाजासेवाकांसाठी .....

ज्यांना या दिव्याचं  खर रहस्य उलघडलाय  त्यांचासाठी.....
" जे स्वतः जाळून इतरांना प्रकाशमान करतात  त्यांचासाठी ".......
एक तरी दिवा लावावा.....
हीच ती काय  प्रार्थना -
" तमसोमाज्योतीर्गामय "
( मला अंधाराकडून  प्रकाशाकडे ने  )
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ......
......................................जयेश फडणीस 

No comments:

Post a Comment