Saturday, 31 December 2011

सरत्या वर्षातले " डायरीचे शेवटचे पान "
आज ३१ डिसेंबर  २०११
म्हणता म्हणता हेही वर्ष सरून गेले
बघता बघता दिवसही ते संपून गेले
डायरीची पाने हि मग उलटून जराशी ,
क्षण  हे आठवणींच्या हिंदोळ्यात  विरून  गेले ||

क्षणच ते............
काही हसवत गेले , काही हसत गेले
काही कुणाच्या  सोबतीने , काही कुणा विना गेले

क्षणोक्षणींच्या आठवणी त्या .......
भूतकाळ तो मागे सरला ....
भविष्याचा वेध घेण्यास ,
वर्तमान तो सामोरी आहे
संकल्पाच्या गाठी  सोडत
 नववर्षाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत !

हि अखेरची घटका आणिक ,
 एक नवी दिशा ती
त्या क्षितीजावर बघ....
नवीन उमेदीने नव्या आव्हाना सह उजाडते आहे !
उद्या पुन्हा होईल मग एक नवा सूर्योदय !!!!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
*** WISH U ALL A HAPPY NEW YEAR***

जयेश फडणीस

No comments:

Post a Comment