Tuesday, 25 October 2011

तमसोमाज्योतीर्गामय


दिवाळीचा  सण
दिव्याची रोषणाई नि रंगांची उधळण 
उत्साहाचा आनंदाचा तेजोमय क्षण ......

अशा या मंगल दिनी 
एक  दिवा लावावा   देवापुढे - सुख  आणि शांती साठी ....
एक  दिवा लावावा   उंबरठ्यावर - यश प्राप्तीसाठी  नि सदसतविवेकसाठी ....
एक  दिवा लावावा  तुळशीवृन्दावनी - समृद्धी नि वैभवासाठी ....
एक  दिवा लावावा रांगोळीभोवती - आनंद  आणि समाधानासाठी ....

मग
 एखादा  तरी   दिवा लावावा  त्यांचासाठी जे आजही अंधारात आहेत .....
ज्यांचा कडे तूप नाही , तेल नाही,
 दिव्याला वात नाही, ज्यांना  कोणाची साथ नाही ......

 एखादा  तरी   दिवा लावावा  त्या हौतात्म्य पत्कारनार्यांसाठी .....
 एखादा  तरी   दिवा लावावा  त्या वीर देश बांधवांसाठी (सैनिकांसाठी) .....
 एखादा  तरी   दिवा लावावा आजन्म समाज कार्य करणाऱ्या थोर सामाजासेवाकांसाठी .....

ज्यांना या दिव्याचं  खर रहस्य उलघडलाय  त्यांचासाठी.....
" जे स्वतः जाळून इतरांना प्रकाशमान करतात  त्यांचासाठी ".......
एक तरी दिवा लावावा.....
हीच ती काय  प्रार्थना -
" तमसोमाज्योतीर्गामय "
( मला अंधाराकडून  प्रकाशाकडे ने  )
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ......
......................................जयेश फडणीस 

Saturday, 22 October 2011

लहान पण देगा देवा .....आजही आठवतात ते 


गोड गोड जिव्हाळ्याचे लाडिक क्षण ...


रम्य ते गोजिरवाणे बालपण ....आजही आठवतात ती 


आईच्या कुशीतली साखर झोप...

.
दिवस भर हुंदडायचं -खेळायचं -खायचं


रात्री येऊन निवांत झोपायचं छान ...आता तशी झोप काही लागत नाही ..

.
ते दिवस जगायला हि जमत नाही ...आजही आठवतो तो 


आईने भारावलेला मऊ मऊ दुध भात 


गोडीलाडी करत मग हळूहळू खायचं 


एकेका घसा साठी सैरावैरा पाळायच...


बाबांचा पाठीवर बसून मग घोडा घोडा खेळायचं ...


लहान खेळण्यान सोबत बसून अजून लहान व्हायचं...


पत्त्यांचे बंगले बांधून मजेत उधळून द्यायचं...

रस्त्याने चालतानाही मग बोट धरून चालायचं...


मुद्दाम कंटाळा करून हात वर करायचं 


ऐटीत कडेवर बसून गालातल्या गालात हसायचं..

.
हव्या त्या गोष्टी साठी हट्ट करायचं नि खोटा नाट रडायचं...


रडून रडून मग शांत पणे झोपायचं...


आता काही केल्या जमत नाही

...
झोपेसाठी सुद्धा रडावं लागत... रडत रडत झोपावं लागत...आजही आठवतात ती 


लहानपाणीची भांडण - " पेल्यातली वादळ "...


कडी 'कट्टी' तर कडी 'बट्टी'...


रुसवे फुगवे ते नेहमीचेच...


नव्याने डाव मांडायचो...


आता तसा होत नाही ...


मागे काही उरत नाही...आजीचा बरोबरीन देवासमोर चुपचाप बसायचो ....


देवाची स्तोत्र नि रामरक्षा म्हणायचो ...


" प्रसादाकडे " लक्ष ठेऊन मग डोळे मिटून बसायचो ...


'गृहपाठ ' करून अगदी मनसोक्त खेळायचो ...


चार भिंतीतलं जग जगायला खूप खूप आवडायचं...रात्र झाली कि दिवस संपायचा ...


त्या दिवसाचा शेवट हि तिथच व्हायचं....


दुसरा दिवस एक नवीन सकाळ घेऊन यायचा..

.
घरातल्या खिडकीवर 'चिऊ' चिवचिवाट करत बसायची...


नवीन स्वप्ने पहायची इच्छा असायची....


आता मात्र दिवस काही केल्या संपत नाही ...


नवीन दिवस काही उजाडत नाही...


घरातल्या खिडकीवर 'चिऊ' हि बसत नाही....

आजही आठवतात ते

गोड गोड जिव्हाळ्याचे लाडिक क्षण ...


रम्य ते गोजिरवाणे बालपण ....