Monday 15 August 2011

कट्ट्यावरच्या आठवणीतल्या चारओळी...



गणिताच्या तासाला बसणं


हि जरी सजा आहे


तरी नवीन मॅडमना पाहणं


यातही थोडी मजा आहे........

आम्हाला फिजिक्स शिकवणारी


एक सुंदर मिस आहे


सगळे म्हणतात कॉलेज मध्ये फक्त


तेवढाच चांगला पीस आहे.......

स्टाफ रूम मध्ये सरांची


मॅडम वर नजर आहे


दारा आडून बघायला सारे


कट्ट्या वरचे हजर आहेत ............

लेक्चर ला बसलोच चुकून


तर ' ती ' च्या कडेच नजर आहे


प्रश्न विचारला सरांनी तर


काय " हरी नामाचा " गजर आहे.......

पेपर मध्ये प्रश्न पडतो..


काय ' work 'चं unit ' ज्यूल ' आहे ??


माहित नाही कारण लेक्चर पेक्षा


कँटिन चा attendance ' फूल ' आहे........

इतरांच्या प्रेम प्रकरणात


सर्वांच लक्ष आहे


एकटा कोणी सापडला की कट्ट्या वरच्या


" आजच्या मेन्यू " तल ते ' भक्ष्य ' आहे.......

न्यूटन चे नियम नि प्रेमाचे त्रिकोण तर


आता रोजचे आहेत


कट्ट्या वरचे सर्व जण


" बेरजेत मिळालेले हातचे आहेत "........

कॉलेजात कोणी पटली नाही ...


कधी पटेल, कळत नाही.... पण


कट्ट्या वरचे ' मित्र ' मात्र ,


इतक्या सहज सहजी मिळत नाहीत.........

FRIENDS FOREVER.......................​..............................​......................

1 comment:

  1. THIS POEM IS BEING WRITTEN BY ME WHEN I WAS IN 'BIRLA COLLAGE KALYAN'. I REMEMBER I BUNK THE LECTURE AND I WAS SITTING ON GROUND... AND JUST THE THOUGHT COME IN MY MIND.... I WAS REALLY MISSING MY FRIENDS... SO... DEDICATED TO MY FRIENDS...

    ReplyDelete