Monday 15 August 2011

प्रेमात नेमकं असं कस घडतं?



ऐन ग्रीष्मातच झाडाला पालवी फुटलेली वाटते ..


काट्यांना च फुले आलेली दिसतात ..


सुकलेलं गवतहि हिरवगार दिसत....


प्रेमात नेमकं असं कस घडतं?......





जागेपणीच स्वप्नं पडतात ..


येता जाता आरशात बघावसं वाटत ..


गाणी गुणगुणत हिंडावस वाटत ..


प्रेमात नेमकं असं कस घडतं?......



गुलाबी रंगच मग आवडीचा वाटतो....


सतत तिचा विचार मनात दाटतो...


तिचा सादा आवाज ऐकायला जीव आटतो..


प्रेमात नेमकं असं कस घडतं?......



एक साधा मिस्ड कॉलच कारणीभूत ठरतो...


का? आपल्याला वेगळ्याच रंगात भरतो...


त्या मिस्ड कॉलवर मग तडग फोन करतो..


अन नकळत त्या मिस च्याच प्रेमात पडतो..


नेमक प्रेमात असं कस घडतं???



कधी कधी तिचा कॉल रिसीव्ह होतो..


" तू का केलास मीच करतो ..." असं आपण म्हणतो..


मनात काहीतरी वेगळं असत ,ओठावर यायला कपात असत..


कोणाला ते कस सांगाव हेच मुळी कळत नसत...


नेमक प्रेमात असं कस घडतं???



कधी तिचा एस .एम .एस. येतो..


तोच मग दहा वेळा वाचत बसतो...


प्रत्येक शब्दा मध्ये तीच असल्याच वाटत..


पण तिलाही तो कोणी तरी फॉरवर्ड केल्याच ते आपण विसरतो...


मग नेमक प्रेमात असं कस घडतं???



सतत चेहेरा समोर असतो..


दिसता क्षणी ती ओझरती , ओठांवर मंद हसू उमटत....


प्रत्यक्ष भेटल्यावर तर भानच हरपत..


बोलायचं एवढं असत ,पण सगळंच विसरत...


मग नेमक प्रेमात असं कस घडतं???



मिस्ड कॉल ची गाथातर चालूच असते..


मग उगीचच आपल्यालाच भाव खावासा वाटतो...


आणि अचानक रिसीव्ह लिस्ट मधून तिचा नंबर गायब होतो..


मिस्ड कॉल हि बंद होतात...



आपण सतत फोन जवळच असतो..

केवळ मग त्या मिस्ड कॉलची वाट पाहत बसतो....


 का कोणास ठावूक पण ...........


प्रेमात नेमक असं कस घडतं?
..............................​.....................

1 comment:

  1. LOVE... WELL ITS JUST A BEAUTIFUL FEELING IN LIFE THAT GOD GIFTED TO EVERY INDIVIDUALS, EVERY LIVING BEINGS...
    WHAT I THOUGHT THAT " KNOWLEDGE " AND " LOVE " ARE TWO BASIC BUILDING BLOCKS OF LIFE TO LIVE LIKE A MAN... A PERFECT HUMAN BEING!!!

    ReplyDelete